दृष्टीकोन
ग्रामपंचायत जवळगा (मे) गाव हे धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील एक सुंदर, हिरवेगार आणि संस्कृतीसमृद्ध गाव आहे.तसेच गावाता मेसाई मंदीर असुन ते गावातील लोकांचे श्रदधास्थान आहे. गावाच्या सभोवताल डोंगर, शेतशिवार आणि निसर्गसंपन्न परिसर असल्याने हे ठिकाण ग्रामीण महाराष्ट्राचं खया अर्थानं दर्शन घडवतं. येथील लोक परिश्रमी, नम्र आणि एकोप्याने राहणारे आहेत. शेती हा येथील मुख्य व्यवसाय असून ऊस, तांदूळ, मका, आणि भाजीपाला ही पिक मोठ्या प्रमाणावर घेतली जातात. तसेच काही ग्रामस्थ दुग्धव्यवसाय आणि लघुउद्योगात कार्यरत आहेत.जवळगा(मे) ग्रामपंचायत गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणीपुरवठा आणि पायाभूत सुविधा या क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीने अनेक उपक्रम राचवले आहेत. "स्वच्छ गाव हरित गाव हे ध्येय साध्य करण्यासाठी गावातील प्रत्येक नागरिक सक्रिय सहभाग घेतो. ग्रामपंचायतीच्या मार्गदर्शनाखाली शासकीय योजना आणि सामाजिक कार्यक्रम प्रभावीपणे टाववले जातात, ज्यामुळे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे.