कर भरणा
कृपया गावातील तसेच गावच्या हद्दीतील सर्व वाडी- वस्त्यांवरील सर्व नागरिकांनी आपल्या घराची विहित घरपट्टी, पाणीपट्टी, पिण्याच्या पाण्याचे नवीन कनेक्शन असेल तर डिपॉझिट तसेच सर्व थकबाकीची रक्कम दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी जमा करून सहकार्य करावे.
तसेच सर्व नागरिकांनी प्रतिमाणशी ₹ २००/- एवढी लोकवर्गणी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पूर्वी ग्रामपंचायतीकडे जमा करावी. जवळगा (मे) वाडी- वस्त्यांवरील सर्व नागरिकांनी दि. ३१ ऑक्टोबर २०२५ पर्यंत घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी जमा केल्यास मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात आपल्या जवळगा (मे) ला १० गुण मिळतील. तसेच गावामध्ये तसेच वाडी- वस्त्यांवर शक्य ती विकासकामे करण्यासाठी हक्काचा निधी उपलब्ध होणार आहे.
आता घरपट्टी, पाणीपट्टी व लोकवर्गणी घरबसल्या भरु शकता. आपल्या जवळगा (मे) ग्रामपंचायतीचे विविध कर भरण्यासाठी आधुनिक QR Code ची सुविधा उपलब्ध

कृपया घरपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा

कृपया पाणीपट्टी भरण्यासाठी वरील QR कोड स्कॅन करा
कर भरणा
उपलब्ध डिजिटल सेवा
कर भरणा
घरपट्टी आणि इतर कर आता ऑनलाइन पद्धतीने भरा.
स्वयंघोषणापत्रे
घोषणापत्रे डाउनलोड करा व अर्जासाठी वापरा.
जनसुविधा लिंक्स
महत्त्वाचे सरकारी पोर्टल्स व सुविधा.









